Friday, March 2, 2012

Murraya Koenigii Chutny (कढीलिंबाची चटणी) (51st Serv)

प्रिय गृहिणिंनो,

साधी आमटी करतांना फोडणीला चार कढीलिंबाची पानं आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरली तर आमटिची चवच बदलून जाते. खरंतर कढीलिंब (Murraya Koenigii) काय किंवा कोथिंबीर, पुदीना, तमालपत्र काय हे कुठलंही पान जेवणात आलं तर बाजूला काढून टाकलं जातं.
 पण ही पानं जर स्वयंपाकात नसतील तर जेवणाची लज्जत देखिल कमी होइल. कढीपत्त्याचा अपवाद सोडला तर ही पानं ही काही फ़क्त आपलीच मक्तेदारी नाही तर जगभरात सगळीकडे या पानांचा पदार्थाची चव वाढविण्यासाठी, पदार्थाला सुगंधी करण्यासाठी केला जातो.

Murraya Koenigii Chutny
कढीलिंब (Murraya Koenigii) मात्र भारताची खासियत! कढीपत्त्याशिवाय आपल पान हालत नाही. कढीलिंब देखील पोटात गेला पाहिजे. यातून व्हिटामीन 'ए' आणि कँल्शीयम मिळतं. आयुर्वेदात कढीलिंबाचा औषधासाठी देखील वापर केला जात असे. कढीलिंबाची पानं आणि मीरं एकत्र वाटून जर अंशापोटी घेतलं तर म्हणे ते (Murraya Koenigii on Diabetes) मधुमेहावर गुणकारी आहे. 

तसंच उलट्यांचा त्रास होत असेल तर कढीलिंबाची भाजलेल्या पानांची पूड करून खाल्ली जात असे. पानांचाच नाही तर कढीलिंबाच्या मुळांचा आणि खोडाचा देखील पोटाच्या विकारावरिल औषधात तसेच टाँनिकमध्ये वापर केला जात असे. आज याचा वापर केला जातो किंवा नाही याची मात्र मला कल्पना नाही.

आपल्याकडे पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर कुठेही गेलं तर कढीलिंबाचा स्वयंपाकात वापर अपरिहार्य आहे. असं म्हटलं जातं की रानात फोफावणा-या या झाडाच्या सुगंधाकडे आकृष्ट होउन माणसानं पानं काढून खाऊन बघितली. पण नुसत्या पानांची चव काही चांगली लागेना. योगायोगाने ही पानं दुस-या पदार्थात मिसळली असता त्या पदार्थाची चव वाढते हे लक्षात आलं आणि आपल्याकडे कढीलिंबाचा वापर सुरू झाला. आपल्याकडून कढीलिंब श्रीलंका, मलेशिया ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत पोहोचला आणि तिथल्या स्वयंपाकात देखील महत्वाचं स्थान मिळवलं. 

श्रीलंकेत चिकन आणि बीफ करिजमध्ये कढीलिंब वापरला जातो. भारतीय क्विझिनने (Indian Cuisine) जगभर लोकप्रियता मिळवली आहे तेव्हा आपल्या मसाल्यांना महत्व मिळणं अपरिहार्य आहे. आता युरोपमध्ये देखील कढीलिंबाची पावडर मिळते! या पावड़रची चव कशी असेल तशी असो पण या पावडरला जर थोडीशी आपल्या चवीची जोड दिली तर वेगळ्या प्रकारची कढीलिंबाची चटणी होइल. त्या निमित्यानं कढीलिंब पोटात जाईल.

गृहिणिंनो, ही कढीलिंबाची चटणी अवश्य तुमच्या संग्रही राहू द्यात.

साहित्य:

०१. दोन वाटया ताज्या कढीलिंबाची पानं
०२. अर्धी वाटी तिळ
०३. एक वाटी किसलेलं खोबरं
०४. अर्धी वाटी दाण्याचं (शेंगदाणा) कुट
०५. तिखटाच्या प्रमाणानुसार हिरव्या मिरच्या आणि मीठ

कृति:

कढीलिंबाची ताज़ी पानं आणि मिरचीचे तुकडे तेलावर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्या. तिळ, खोबरं भाजून घ्या. भाजलेल्या दाण्याचं (शेंगदाणा) कुट करा. कढीलिंब, तिळ, खोबरं आणि दाण्याचं कुट एकत्र करून मिक्सरवर बारीक वाटून घ्या. ही हिरवीगार चटणी खूप छान लागते.

मी तर करून बघितली आता तुम्ही करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा ....

"Murraya Koenigii Chutney" या विषयावरील महत्वाचे 3 प्रश्न आणि उत्तरे:

1. Murraya Koenigii Chutney म्हणजे काय?
उत्तर: Murraya Koenigii Chutney हा ताजे कढीपत्ता, मसाले आणि इतर घटकांपासून बनवलेला एक चवदार आणि सुगंधी भारतीय मसाला आहे.

2. सामान्यतः ते कसे वापरले जाते?
उत्तर: हे भारतीय पाककृतीमध्ये पारंपारिकपणे मसाला किंवा साइड डिश म्हणून वापरले जाते, बहुतेकदा तांदूळ, डोसे, इडली किंवा चव वाढवण्यासाठी इतर पदार्थांसोबत दिले जाते.

3. Murraya Koenigii Chutney मध्ये मुख्य घटक कोणते आहेत?
उत्तर: मुख्य घटकांमध्ये कढीपत्ता, किसलेले खोबरे, चिंच, हिरव्या मिरच्या आणि मोहरी, उडीद डाळ आणि तेल यांसारख्या मसाल्यांचे मिश्रण समाविष्ट आहे.

More Delicious Servings:
01. My Kitchen : Dum Aloo (1st Serv)
02. My Kitchen : Baingan Masala (2nd Serv)
03. My Kitchen : Vej Karela (3rd Serv)
04. My Kitchen : Gobhi (Cabbage) & Kaju Vej (4th Serv)
05. My Kitchen : Carrot Salad (5th Serv)
06. My Kitchen : Spinach (Palak) & Saag (6th Serv)
07. My Kitchen : Dahi & Pudina ki Chatny (7th Serv)
08. My Kitchen : Hara Dhaniya (Coriander) ki Chatny (8th Serv)
09. My Kitchen : Simple Chiken Curry (9th Serv)
10. My Kitchen : Caramel Custard (10th Serv)
11. My Kitchen : Aloo Pizza (11th Serv)
12. My Kitchen : Fried Fish - Masala (12th Serv)
13. My Kitchen : Meat Curry (13th Serv)
14. My Kitchen : Veg Shelgma (14th Serv)
15. My Kitchen : Spinach Raita (15th Serv)
16. My Kitchen : Punjabi Choley (16th Serv)
17. My Kitchen : Mango Mousse (17th Serv)
18. Sukadi : The Nutritious Food you never forget! (18th Serv)
19. Breakfast : The Good Habit for everyone!
20. Bohri’s Delicious Servings: Sheer Khurma (19th Serv)
21. Bohri’s Paya (20th Serv)
22. Breakfast : The Belly Rules the Mind
23. Shrimp Stuffed Papaya (21st Serv)
24. Hakka Noodles: A Nutritious Recipe (22nd Serv)
25. Mixed Vegetable Soup (24th Serv)
26. Kolhapur Special Misal Pav : Spicy Curry With Bread (25th Serv)
27. Salad Wrap (26th Serv)
28. Omelette with Sprouts and sev (27th Serv)
29. Chicken Curry (28th Serv) : Sunday Special Night
30. How To Make Crab Curry? (29th Serv)
31. Common Tips while making rice - 1
32. Roti : My Views From Kitchen
33. Making of Chapattis (30th Serv)
34. Notes To Remember While Making Chapattis - 1
35. Chapatti : A Map Of Australia - 2
36. Making of Chapatti : Another Technique - 3
37. Making of Pooris (31st Serv)
38. Useful Cooking Tips - 1
39. Useful Cooking Tips - 2
40. Useful Cooking Tips - 3
41. खास उन्हाळ्यासाठी .....(It is Summertime ....)
42. द्राक्षाचे काही टिकाऊ पदार्थ
43. सरबत : पँशनफ़्रुट आणि बेलाचे
44. नारळाची करी आणि नारळाचे वडे
45. शहाळ्याचे थंड पेय
46. नारळाची धिरडी आणि नारळाची कोशिंबीर
47. Kitchen Tips : To keep your Kitchen clean
48. Rajsthan Recipe : बाजरा लाफ्शी (राजस्थानी पाककृती)
48. Rajsthan Recipe : पिठोरे कढी (राजस्थान पाककृती)
49. Rajsthan Recipe : राजस्थानी पापडी रायता (राजस्थानी पाककृती)
50. Rajsthan Recipe : शाही मावा कचोरी (राजस्थानी पाककृती)
51. Rajsthan Recipe : शाही मावा कचोरी (राजस्थानी पाककृती)
52. Rajsthan Recipe : राजस्थानी शाही लाडू (राजस्थानी पाककृती)
53. Besan Poli : बेसन पोळी
54. Til Gul Poli : तिळ-गुळाची पोळी
55. Chinese Recipe : Veg Clear Soup
56. Chinese Recipe : Veg Fried Rice
57. Kentucky Fried Chicken (KFC) : Just Delicious
58. How to Poach An Egg : A 3 Minute Delicious Recipe
59. Women - They Always Select Best

No comments: