Friday, November 11, 2011

Green Masala Fish Fry : (ग्रीन मसाला फिश फ़्राय) (43rd Serv)

सध्या गोव्यात आल्यापासून आमची चंगळ आहे. होय! सहा महिने झालेत आता. यांना मिळालेल्या गोव्यातील नविन जॉब मूळे गोवन पदार्थ (Goan Recipe) करण्याची आणि करून खाऊ घालण्याची हौस भागवत आहे.

आज प्रथमच Green Masala Fish Fry (ग्रीन मसाला फिश फ़्राय) करून बघितला...यांना तर खूप आवडला.

आता तुम्हां सर्वांचे मत काय आहे ते पहायचे आहे...त्यासाठी ही कृति करून बघा...

Fish Fry
साहित्य:

१. ४ मध्यम आकाराचे सरंगे, ४ वाटी ओले खोबरे, ९/१० लसूण-पाकळ्या, एक मोठा आले तुकडा, ७ हिरव्या मिरच्या, २ वाटी चिरलेली कोथिंबीर.

२. २५ ग्रँम बादाम, २५ ग्रँम पिस्ते, ५० ग्रँम काजू, २५ ग्रँम चारोळी

३. २ टी-स्पून तिखट, अर्धा टी-स्पून हळद

४. चवीनूसार साखर व मीठ

५. तेल

कृति:

खोबरे, कोथिंबीर आणि मिरच्या पाणी टाकता वाटून ठेवा. लसूण, आले एकत्र वाटून ठेवा. मिरची-वाटणावर अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर टाका. चारोळी थोडीशी भाजून त्यांची साले काढा. पिस्ते, बादाम, काजू यांचे कापून पातळ काप करा. हे सर्व मिरची-खोबरे वाटणात कालवून ठेवा.

सुरीने सरंगे तोंडाच्या बाजूने कापून आतून पोकळ करा. सूरी काटयाच्या बाजूने घालून सरंग्याचे दोन तुकडे होणार नाहित, असे पाहून आतील काटा अलगद काढा. नंतर सरंगे पाण्याखाली स्वच्छ धुवा. त्याला हळद, मीठ, तिखट, लसूण-आले वाटण आणि लिंबू रस लावा. तयार केलेले मिरची वाटण सरंग्यात घट्टसर भरा. भरलेल्या सरंग्याला थोड्या तांदळाची पीठी लावून फ़्राय पँन मध्ये घालून तळा. बादामी रंगावर तळले, की अलगद उलटवून दूसरी बाजू तळा. मसाला भरलेले सरंगे तळता केळीच्या पानात गुंडाळून उकडून घेतले, तरी चालतात.

खरेतर ही (Goan Cuisine) ची मजा तुम्हां सर्वांना खूप आवडेल यात शंकाच नाही.

आता घरातिल सर्वांना ही Green Masala Fish Fry कृति सर्व करा आणि आपला अभिप्राय दया.

"ग्रीन मसाला फिश फ्राय" या विषयावरील महत्वाचे 3 प्रश्न आणि उत्तरे:

1. प्रश्न: ग्रीन मसाला फिश फ्राय बनवण्यासाठी मुख्य घटक कोणता आहे?
उत्तर: ग्रीन मसाला फिश फ्राय बनवण्याचा मुख्य घटक म्हणजे औषधी वनस्पती आणि मसाल्यापासून बनवलेली चवदार हिरवी मसाला पेस्ट.

2. प्रश्न: ग्रीन मसाला फिश फ्रायसाठी तुम्ही मासे मॅरीनेट कसे करता?
उत्तर: मासे मॅरीनेट करण्यासाठी, हिरव्या मसाला पेस्टने पूर्णपणे कोट करा आणि चव शोषण्यासाठी किमान 30 मिनिटे बसू द्या.

3. प्रश्न: ग्रीन मसाला फिश फ्रायसोबत सर्व्ह करण्यासाठी लोकप्रिय साइड डिश कोणती आहे?
उत्तर: ग्रीन मसाला फिश फ्राय सोबत एक लोकप्रिय साइड डिश म्हणजे पुदिन्याची चटणी किंवा ताजी काकडी आणि टोमॅटो सॅलड.

More Delicious Servings:
01. My Kitchen : Dum Aloo (1st Serv)
02. My Kitchen : Baingan Masala (2nd Serv)
03. My Kitchen : Vej Karela (3rd Serv)
04. My Kitchen : Gobhi (Cabbage) & Kaju Vej (4th Serv)
05. My Kitchen : Carrot Salad (5th Serv)
06. My Kitchen : Spinach (Palak) & Saag (6th Serv)
07. My Kitchen : Dahi & Pudina ki Chatny (7th Serv)
08. My Kitchen : Hara Dhaniya (Coriander) ki Chatny (8th Serv)
09. My Kitchen : Simple Chiken Curry (9th Serv)
10. My Kitchen : Caramel Custard (10th Serv)
11. My Kitchen : Aloo Pizza (11th Serv)
12. My Kitchen : Fried Fish - Masala (12th Serv)
13. My Kitchen : Meat Curry (13th Serv)
14. My Kitchen : Veg Shelgma (14th Serv)
15. My Kitchen : Spinach Raita (15th Serv)
16. My Kitchen : Punjabi Choley (16th Serv)
17. My Kitchen : Mango Mousse (17th Serv)
18. Sukadi : The Nutritious Food you never forget! (18th Serv)
19. Breakfast : The Good Habit for everyone!
20. Bohri’s Delicious Servings: Sheer Khurma (19th Serv)
21. Bohri’s Paya (20th Serv)
22. Breakfast : The Belly Rules the Mind
23. Shrimp Stuffed Papaya (21st Serv)
24. Hakka Noodles: A Nutritious Recipe (22nd Serv)
25. Mixed Vegetable Soup (24th Serv)
26. Kolhapur Special Misal Pav : Spicy Curry With Bread (25th Serv)
27. Salad Wrap (26th Serv)
28. Omelette with Sprouts and sev (27th Serv)
29. Chicken Curry (28th Serv) : Sunday Special Night
30. How To Make Crab Curry? (29th Serv)
31. Common Tips while making rice - 1
32. Roti : My Views From Kitchen
33. Making of Chapattis (30th Serv)
34. Notes To Remember While Making Chapattis - 1
35. Chapatti : A Map Of Australia - 2
36. Making of Chapatti : Another Technique - 3
37. Making of Pooris (31st Serv)
38. Useful Cooking Tips - 1
39. Useful Cooking Tips - 2
40. Useful Cooking Tips - 3
41. खास उन्हाळ्यासाठी .....(It is Summertime ....)
42. द्राक्षाचे काही टिकाऊ पदार्थ
43. सरबत : पँशनफ़्रुट आणि बेलाचे
44. नारळाची करी आणि नारळाचे वडे
45. शहाळ्याचे थंड पेय
46. नारळाची धिरडी आणि नारळाची कोशिंबीर
47. Kitchen Tips : To keep your Kitchen clean
48. Rajsthan Recipe : बाजरा लाफ्शी (राजस्थानी पाककृती)
48. Rajsthan Recipe : पिठोरे कढी (राजस्थान पाककृती)
49. Rajsthan Recipe : राजस्थानी पापडी रायता (राजस्थानी पाककृती)
50. Rajsthan Recipe : शाही मावा कचोरी (राजस्थानी पाककृती)
51. Rajsthan Recipe : शाही मावा कचोरी (राजस्थानी पाककृती)
52. Rajsthan Recipe : राजस्थानी शाही लाडू (राजस्थानी पाककृती)

No comments: