आपण आज काही राजस्थानच्या पाककृती पाहुयात.
बहुतेक आपण सर्वानी बाजरा लाफ्शी बद्दल ऐकले असेलच. त्याची थोडक्यात कृति समजावून घेउयात. यासाठी खालील साहित्य असणे आवश्यक आहे.
साहित्य :
१. पावशेर बाजरीची जाडसर भरड
२. १५० ग्रँम गूळ किंवा साखर आवडिप्रमाणे
३. साजूक तूप
४. ड्रायफ़्रूट्सचे पातळ काप
५. वेलची पूड
६. दूध बाजरीच्या चार पटीने घ्यावे
कृति :
बाजारी भरड तूपात परतावी. त्यात दूध घालून शिजवावे, शिजल्यावर चांगली वाफ आणावी. साखर/गूळ टाकावे. परत थोड़े वाफवून वेलची पूड व ड्रायफ़्रूट्सचे काप टाकावे. राजस्थानात खासप्रसंगी किंवा सणावाराला ही सैलसर लाफ्शी करण्याची प्रथा आहे.
तेव्हा लगेच तयार क़रा ही बाजरा लाफ्शी ....

0 comments:
Post a Comment