Social Icons

Pages

Wednesday, March 16, 2011

शहाळ्याचे थंड पेय

शहाळे (Coconut Water) - हा एक सर्वांचा आवडता विषय..!!! बराही महिने मिळणारे हे फळ सर्वांचा अंतरात्मा थंड ठेवण्याचे काम करते. याच संदर्भात शहाळ्याचे थंड पेय कसे तयार करावयाचे ते पाहुयात.

साहित्य : शहाळे ४ मोठी, मीठ पाव चमचा, लिंबे ३, मध १ कप, पुदीना १०/१२ पाने (आवडीप्रमाणे)

कृती : शहाळ्यातले पाणी पातेल्यात काढून घ्यावे. त्यात तिन लिंबाचा रस, कप मध (थोडा कमी चालेल) शहाळ्यातल्या मलईचे वाट्या तुकडे करून किंवा मिक्सर मधून बारीक करून, पुदिन्यांची /१० पाने चिरून (आवडत असल्यास) पाण्यात घालावी वरील भांडे फ्रीजमधे गार करून घ्यावे.

असेच ओल्या नारळाचे पण थंड पेय करतात. फ़क्त नारळ घ्यावेत मलईच्या ऐवजी ओले खोबरे खवून घ्यावे.
Post a Comment