Social Icons

Pages

Saturday, September 13, 2014

Rice Appe and Chutney

साहित्य :- ४ वाट्या तांदुळ,१ वाटी उडदाची डाळ, चवीपुरते मीठ
चटणीसाठी :- एका नारळाचे छोटे तुकडे अथवा चव, ३/४ मिरच्या, ६ लसुण पाकळ्या, १ इंचाचा आल्याचा तुकडा, साखर, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर अर्धी वाटी, फ़ुटाण्याचे डाळे अर्धी वाटी....
कृती :- साधारण २/३ तास डाळ आणि तांदुळ वेगवेगळे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सर वरुन एकत्र काढावेत. हे पीठ एकदम गुळगुळीत काढावे. इडली सारखे रवाळ नको. हे पीठ चांगले रुबायला गरम हवेला ६ ते ७ तास बास होतात. तर हिवाळ्यात १० तास लागतात. पीठ रुबल्यावर त्यात चवी प्रमाणे मीठ घालुन त्याचे अप्पे करायला घ्यावेत. अप्पे करताना ते मंद आचेवर केल्यास छान खुसखुशीत होतात. साधारण हलक्या ब्राउन शेडवरच काढावेत, करपवु नयेत. हल्ली नॉनस्टीकचा पण तवा मिळतो त्यावर छान होतात.)
खोबर्‍याची चटणी मिक्सर वर वाटुन घ्यावी.
अप्पे गरम गरमच खावेत.