Social Icons

Pages

Thursday, January 26, 2012

Women - They Always Select Best

प्रिय ग्रुहिणिंनो,

Eeating Right to Look and Feel Your Best! याचा अर्थ नक्कीच तुम्हाला समजला असेल. घरात कोणती भाजी करायची? हा प्रश्न असो किंवा होटेलमध्ये कोणत्या खाद्यपदार्थांची "आर्डर" द्यायची, हे ठरवायचे असो; या दोन्ही बाबतीत पुरूषांपेक्षा महिला आवडत्या खाद्यपदार्थांची निवड लवकर झटपट करतात यात काही दुमत असण्याचे कारण नाही. हा निष्कर्ष आहे Carlos Ribeiro या शास्त्रज्ञाने केलेल्या संशोधनाचा.

Family Dining
पोषक घट्कांच्या द्रुष्टिकोनातून शरीराच्या गरजा आणि लिंग या आधारे आवडत्या खाद्यपदार्थांची निवड केली जाते, असा हा निष्कर्ष आहे. आवडत्या खाद्यपदार्थांची निवड करण्याच्या प्रक्रियेत मेंदू आणि जनुकांना (जिन्स) सर्वप्रथम संकेत प्राप्त होतात, याकडे रिबेरियो यांनी लक्ष वेधले आहे. कोणत्या खाद्यपदार्थांची निवड करायची, हा निर्णय प्रत्यक्षात मेंदू घेत असला तरी याबाबतीत मेदूवरही आनुवंशिक गुणधर्मांचा प्रभाव येत असावा. जगातील बहुसंख्य देशात "स्वयंपाकघर" आणि "स्वयंपाक" ही आजही महिलांची जबाबदारी समजली जाते.

महिलांनी पुरूषांपेक्षा भरभर जेवून घ्यावे, जिभेचे जास्त चोचले पुरवू नयेत, असे म्हणण्याचा काळ आता निघून गेला आहे. तरीही आनुवंशिक गुणधर्मांतून हीच शिकवण महिलांना मिळालेली आहे ती त्यांच्या रक्तात भिनलेली आहे. शिवाय "रांधा-वाढा-उष्टी-काढा" या धबडग्यात महिलांच्या जिभेची रसिकता रसरशीत राहाणे शक्यच नसते.

स्वयंपाकानंतर किंवा हाँटेलातून परतल्यानंतर घरात पडलेल्या घरकामाचा डोंगर उपसायचा आहे, हे दडपणही मनावर असते. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून खाद्यपदार्थांच्या निवडीत आपल्याला फारच मर्यादा आहेत किंवा त्या मर्यादा घालून घेणे ही आपली स्त्रित्वाशी संबंधित जबाबदारी आहे, अशी खूणगाठ महिलांनी मनाशी बांधलेली असते. त्याचाच परिणाम म्हणून पुरूषांच्या तुलनेने महिला आवडत्या खाद्यपदार्थांची निवड लवकर करतात, अशी कारणमिमांसा Carlos Ribeiro यांनी केली आहे. आपले काय मत आहे?

Monday, January 2, 2012

Happy New Year 2012

Dear Women of the House....

Happy New Year 2012

Happy New Year 2012From Cooking Funda