Social Icons

Pages

Friday, November 11, 2011

Green Masala Fish Fry : (ग्रीन मसाला फिश फ़्राय)

सद्ध्या गोव्यात आल्यापासून आमची चंगळ आहे. होय! सहा महिने झालेत आता. यांना मिळालेल्या गोव्यातील नविन जॉब मूळे गोवन पदार्थ (Goan Recipe) करण्याची आणि करून खाऊ घालण्याची हौस भागवत आहे.

आज प्रथमच Green Masala Fish Fry (ग्रीन मसाला फिश फ़्राय) करून बघितला...यांना तर खूप आवडला.

आता तुम्हां सर्वांचे मत काय आहे ते पहायचे आहे...त्यासाठी ही कृति करून बघा...

Fish Fry
साहित्य:

१. ४ मध्यम आकाराचे सरंगे, ४ वाटी ओले खोबरे, ९/१० लसूण-पाकळ्या, एक मोठा आले तुकडा, ७ हिरव्या मिरच्या, २ वाटी चिरलेली कोथिंबीर.

२. २५ ग्रँम बादाम, २५ ग्रँम पिस्ते, ५० ग्रँम काजू, २५ ग्रँम चारोळी

३. २ टी-स्पून तिखट, अर्धा टी-स्पून हळद

४. चवीनूसार साखर व मीठ

५. तेल

कृति:

खोबरे, कोथिंबीर आणि मिरच्या पाणी टाकता वाटून ठेवा. लसूण, आले एकत्र वाटून ठेवा. मिरची-वाटणावर अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, साखर टाका. चारोळी थोडीशी भाजून त्यांची साले काढा. पिस्ते, बादाम, काजू यांचे कापून पातळ काप करा. हे सर्व मिरची-खोबरे वाटणात कालवून ठेवा.

सुरीने सरंगे तोंडाच्या बाजूने कापून आतून पोकळ करा. सूरी काटयाच्या बाजूने घालून सरंग्याचे दोन तुकडे होणार नाहित, असे पाहून आतील काटा अलगद काढा. नंतर सरंगे पाण्याखाली स्वच्छ धुवा. त्याला हळद, मीठ, तिखट, लसूण-आले वाटण आणि लिंबू रस लावा. तयार केलेले मिरची वाटण सरंग्यात घट्टसर भरा. भरलेल्या सरंग्याला थोड्या तांदळाची पीठी लावून फ़्राय पँन मध्ये घालून तळा. बादामी रंगावर तळले, की अलगद उलटवून दूसरी बाजू तळा. मसाला भरलेले सरंगे तळता केळीच्या पानात गुंडाळून उकडून घेतले, तरी चालतात.

खरेतर ही (Goan Cuisine) ची मजा तुम्हां सर्वांना खूप आवडेल यात शंकाच नाही.

आता घरातिल सर्वांना ही Green Masala Fish Fry कृति सर्व करा आणि आपला अभिप्राय दया.