Social Icons

Pages

Monday, November 7, 2011

Rajsthan Recipe : राजस्थानी शाही लाडू (राजस्थानी पाककृती)

प्रिय ग्रृहिणिंनो,

आज राजस्थानी शाही लाडू ची कृति बघुयात ....

साहित्य :

१. २५० ग्रँम डाळ्या
२. २५० ग्रँम पिठीसाखर
३. २५० ग्रँम साजूक तूप
४. एक वाटी मिक्स ड्रायफ़्रूट्सचे काप
५. वेलची पूड़
६. जायपत्री पूड़

कृति:

डाळ्या मिक्सरमधून चांगली बारीक दळून घ्या. एका परातीत तूप घेउन चांगले फेटावे. त्यात पीठीसाखर-ड्रायफ़्रूटसचे काप-वेलची जायपत्री पूड़ कालवावी. शेवटी थोडे-थोडे डाळ्याचे पीठ टाकून मिक्स करावेत. लाडू वळवता येईल असे मिश्रण तयार झाल्यावर लाडू वळावेत. वर चांदीचे वर्ख लावावे. लाडू झटपट तयार होतात. चवीलाही छान लागतात.