Social Icons

Pages

Tuesday, October 25, 2011

Rajsthan Recipe : पिठोरे कढी (राजस्थान पाककृती)

प्रिय ग्रृहिणिंनो,

राजस्थानच्या पिठोरे कढी बद्दल ऐकले आहे का कधी? नसेल तर ही कृति करून बघण्यास काहीच हरकत नाही.

साहित्य : कढीकरिता

१. दोन वाटया आंबटसर ताक
२. जिरे-आलं
३. कढीलिंबाची पाने
४. एक टेबलस्पून डाळीचे पीठ
५. बारीक चिरलेली हिरवी मिरची
६. हिंग-मीठ-मेथीदाणे
७. तेल
८. चिरलेली कोथिंबीर

साहित्य : भज्यांसाठी

१. मुगाची दाल अर्धी वाटी
२. आलं-हिरवी मिर्ची-जिरे-हिंग-मीठ

कृति :

भज्यांसाठी मुगाची डाळ चार-पाच तास भिजवून-उपसून वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून लहान-लहान भाजी तळून घ्यावीत. कढी करताना ताकाला डाळीचे पीठ लावून त्यात मीठ घालावे. तेलात हिंग-जिरे-मेथीदाणे-कढीलिंबाची पाने-हिरव्या मिरच्यांची फोडणी करून त्यात ताक ओतावे. आलं किसून घालावे आणि गँस बारीक करून मंद आचेवर कढीला उकळी येऊ द्यावी. पाच-सात मिनिटे उकळ्यावर गँस बंद करून त्यात मुगाची तळलेली भजी टाकावीत. चिरलेली कोथिंबीर घालावी. आवडत असल्यास एक टीस्पून साखर घालून गरमागरम कढी सर्व्ह करावी.

एकदा तरी ही राजस्थानी पिठोरे कढी करून बघाच .... मला खात्री आहे तुम्ही नक्कीच खुश व्हाल!!