Social Icons

Pages

Sunday, October 23, 2011

Rajsthan Recipe : बाजरा लाफ्शी (राजस्थानी पाककृती)

प्रिय ग्रृहिणिंनो,

आपण आज काही राजस्थानच्या पाककृती पाहुयात.

बहुतेक आपण सर्वानी बाजरा लाफ्शी बद्दल ऐकले असेलच. त्याची थोडक्यात कृति समजावून घेउयात. यासाठी खालील साहित्य असणे आवश्यक आहे.

साहित्य :

१. पावशेर बाजरीची जाडसर भरड
२. १५० ग्रँम गूळ किंवा साखर आवडिप्रमाणे
३. साजूक तूप
४. ड्रायफ़्रूट्सचे पातळ काप
५. वेलची पूड
६. दूध बाजरीच्या चार पटीने घ्यावे

कृति :

बाजारी भरड तूपात परतावी. त्यात दूध घालून शिजवावे, शिजल्यावर चांगली वाफ आणावी. साखर/गूळ टाकावे. परत थोड़े वाफवून वेलची पूड ड्रायफ़्रूट्सचे काप टाकावे. राजस्थानात खासप्रसंगी किंवा सणावाराला ही सैलसर लाफ्शी करण्याची प्रथा आहे.

तेव्हा लगेच तयार क़रा ही बाजरा लाफ्शी ....