Social Icons

Pages

Sunday, July 31, 2011

Kitchen Tips : To keep your Kitchen clean

प्रिय गृहिणिंनो,

Kitchen अर्थात स्वयंपाकघराची नियमित स्वच्छता केली जाणे आवश्यक असते. खरेतर या Kitchen Cleaning Tips आपल्याला पुर्णपणे माहीत नसतात. त्यामुळे कधी कधी खूप गोंधळ उडतो. कारण दिवसभर तिथे स्वयंपाकाचे काम चाललेले असते. त्यामुळे स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिलं जाणं जरूरीचं असतं.

kitchen
रात्री झोपायला जाण्यापुर्वी Clean Kitchen असायला हवे. Kitchen sink मधे न धुतलेल्या ताट-वाट्या, भांडी रात्री तशाच ठेवता कामा नयेत. शिजवण्याचा विभाग, baking व साठवणुकीचे विभाग स्वतंत्र असावेत. म्हणजे Kitchen Cleaning करणे सोपे जाते.

Kitchen मधील वस्तु हाताळताना आपले हात स्वच्छ धुतलेले असावेत. Kitchen मधे पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश यायला हवा. शिवाय खेळती हवा असणे गरजेचे असते. Exhaust Fan ची सोयही असायला हवी. अवघड डाग गरम पाण्याच्या सहाय्याने पुसून काढता येतात. यासाठी योग्य आशा cleaning agent चा वापर करता येतो.

Kitchen Accessories
फ्रीजमधे शिल्लक राहिलेला पदार्थ जास्त दिवस तसाच ठेवू नये. Kitchen मधे असणा-या fridge, microwave, mixer-grinder यांची नियमित स्वच्छता केल्यास bacteria यांची वाढ होत नाही. Kitchen मधे sink हे स्टेनलेस स्टील चे वापरावे. म्हणजे हे सिंक स्वच्छतेसही सोपे असते.

पदार्थ असलेली उघडी भांडी दीर्घकाळ तशीच ठेऊ नयेत. भांडी धुण्यासाठी चांगल्या साबणाचा (Kitchen Soap) वापर करावा. Kitchen ची रचना अशी असायला हवी की जेणेकरून तेथे आरामात वावरता आले पाहिजे. Sink, stove किंवा गँस शेगडी आणि इतर वस्तु यांच्यात अंतर फार नसावे. इतर गोष्टी निट व्यवस्थित जागच्या जागी रचल्या जातील हे कटाक्षाने पाहा. योग्य अशी रचना असेल तर आपला बराचसा वेळ वाचतो. वावरायला अडथळा होणार नाही अशी आपली kitchen मधील रचना असायला हवी.


ओला आणि कोरडा कचरा वेगवेगळा करावा. कागद, पिशव्या, नारळाची शेंडी आदी कोरडा कचरा कचराबुट्टीत तर भाज्यांची ओली सालं वगैरे पाँलिथिन बँगमधे ठेवावं. कचरा घरात साठू देऊ नका. kitchen चा ओटा कामानंतर कोरडा करावा.

kitchen task lights
kitchen ची प्रकाशयोजना सुव्यवस्थित असावी. नेहमीच्या साध्या प्रकाशदिव्यांव्यतिरिक्त task lights ची जेथे गरज असेल तेथे आवश्य करावी.