Social Icons

Pages

Friday, March 18, 2011

नारळाची धिरडी आणि नारळाची कोशिंबीर

प्रिय ग्रृहिणिंनो,

नारळ या विषयावरिल -याचशा कृती तुम्ही एव्हाना करून पाहिल्याच असतील आता अखेरच्या या दोन कृती करून बघा. या दोन कृती म्हणजे "सोनेपे सुहागा" या स्वरूपातील आहेत. तेव्हा चला आता किचनमधे या कृती करण्यासाठी!

नारळाची धिरडी :

नारळाचे दूध काढल्यानंतर जो चोथा उरतो त्यात एक वाटी चवाला वाटया तांदळाचे पीट, चवीला मीठ, पाव चमचा खाण्याचा सोडा टाकावा. तिन चमचे तेलाचे मोहन टाकावे. याप्रमाणे पिठ भिजुन खुप फेसावे. तासभर मूरत ठेवावे. नंतर त्याची धिरडी करावीत. गूळ घातलेल्या दुधाबरोबर खाण्यास चांगली लागतात. तिखट चव हवी असल्यास कोथिंबीर, मिरची टाकावी.

नारळाची कोशिंबीर :

साहित्य : नारळाची चव एक वाटी, दही एक वाटी, साखर मीठ चवीपुरते

कृती : एका पातेल्यात नारळाचा चव दही घुसळून घालावे. त्यातच चवीपुरते मीठ, साखर, शोभेकरता डाळिंबाचे दाणे घालावेत. गार करून कोशिंबीर वाढावी. दह्याच्या ऐवजी क्रीम पण वापरता येइल.