Social Icons

Pages

Tuesday, March 15, 2011

नारळाची करी आणि नारळाचे वडे

होय! ग्रृहिणींनो,

आपण आज नारळाची करी आणि नारळाचे वडे या दोन पदार्थांच्या कृतीची माहिती करून घेउयात.

नारळाची करी :

साहित्य : मोठा नारळ, चहाचा चमचा आले लसणाची पेस्ट, / लवंगा, पाव चमचा दालचिनी कुटून, १० ते १५ काळे मिरे, दोन कांदे, तेल

कृती : नारळ खवून त्याचे दूध काढावे. कांदा बारीक कच्चाच वाटून घ्यावा. लवंग, दालचिनिची पूड़ मिरे एकत्र करून कुटून घ्यावेत.

एका पातेल्यात डावभर तेल चांगले तापवावे. त्यात आले लसणाची पेस्ट एक चमचा दालचिनी, लवंगाची पूड टाकावी. दोन ते तिन मिनिटे परतावे. त्यातच वाटलेला कांदा टाकावा. कांदा लालसर झाला की त्यात नारळाचे दूध आवश्यक वाटल्यास पाणी घालावे. चवी पुरते मीठ साखर घालवे एक उकळी येऊ द्यावी.

अशा करीत उकडलेला बटाटा, मटार घालून रस्सा भाजी तयार करता येते... मग केव्हा बेत करताय..?

यानंतर आपण नारळाचे वडे कसे करायचे त्याची कृती जाणून घेउयात.

नारळाचे वडे :

साहित्य : २ वाटया तांदुळ, १ वाटी उड़द दाल, अर्धी वाटी मुगडाळ, २ वाटया नारळाचा चव, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ चवीपुरते, तळायला तेल

कृती : वाटया तांदुळ एक वाटी उडदाची दाळ तास पाण्यात भिजत घालावी. मिक्सरमधून बारीक वाटावे. त्यातच हिरव्या मिरच्या (आवडिप्रमाणे) चमचा जीरे वाट्या नारळाचा चव पण घालावा मिश्रण वाटून सारखे करावे. चवी पुरते मीठ अर्धीवाटी कोथिंबीर त्यात घालावी. मिश्रण घट्टसर असेल. नंतर कढईत तेल तापत टाकावे वरील मिश्रणाचे हातावर वडे थापुन त्यात तळावे. पीठ सैल वाटले तर त्यात चिमुटभर सोडा टाकुन भजी तळावीत किंवा तांदळाचे पिठ किंवा ब्रेड्चा थोड़ा लगदा घालून वडे थापावेत. हो! आमंत्रण द्यायला विसरु नका म्हणजे झालं ...!!!