Social Icons

Pages

Thursday, March 10, 2011

खास उन्हाळ्यासाठी .....(It is Summertime ....)

होय! उन्हाळा सुरु होतोय लवकरच! विशेषत: लिंबू सरबत, याकडे तुम्हा सर्वांचा ओढा नक्कीच असणार. विविध प्रकारचे सरबत, कोशिंबीर आणि पुडींगचा हा मोसम !! चला तर काही घरगुती तयार करता येण्यासारख्या कृति बघुयात!!!

द्राक्षाचे सरबत:

साहित्य : दीड वाटी द्राक्षाचा रस, वाटया साखर, दीड वाटी पाणी, चमचा सायट्रिक असिड, प्रिझर्वेटिव्ह चिमुटभर (Potassium Meta Bi Sulphite)

कृती : बिनबियांची द्राक्षे घ्यावीत. ती स्वच्छ धुवून कोरडी करावीत. पुरणाच्या यंत्रातून द्राक्षाचा रस काढावा. साखरेत दीड वाटी पाणी घालून पाक करावा. साखर विरघळून पाकास उकळी फुटली की तो पाक स्वच्छ फडक्याने गाळून घ्यावा.

द्राक्षाचा रस गाळून गार झालेल्या साखरेच्या पाकात मिसळावा. त्यातच सायट्रिक असिड प्रिझर्वेटिव्ह घालावे. आवडणारा रंग घालावा. आणि हे सरबत बाटलीत भरून ठेवावे...हो! टेस्ट करुन बघा ... मला खात्री आहे बाहेरील सरबता ऐवजी हे घरगुती सरबत खुप थंडावा देऊन जाईल.

द्राक्षाची कोशिंबीर:

द्राक्षाची कोशिंबीर तयार करताना बिन बियांची द्राक्षे घेउन त्याचं दोन दोन तुकडे करावेत. त्यात गोडसर घुसळलेले वाटीभर दही घालून चवीपुरती साखर मीठ घालावे. वाटल्यास एखादे केळ चिरून घालावे.

द्राक्षाचे पुडींग :

साहित्य : १ कपभर काळी द्राक्षे, ४ कप तांदुळाचे पिठ, १ कप पाणी, ३ चहाचे चमचे साखर, १ चमचा लोणी

कृती : १ कप पाण्यात तांदळाचे पिठ व ३ चहाचे चमचे साखर घालावी. सारखे करुन शिजवून घ्यावे.

एका ओव्हनमधील भांड्याला थोडेसे लोणी लावावे त्यावर थोड़ी साखर पेरावी. काळी द्राक्षे अर्धी कापून त्यातील बिया काढून ती त्या भांड्यात टाकावी. तांदळाचे शिजलेले मिश्रण द्राक्षांवर ओतावे. वरून चमचा लोणी पसरावे (वरचा थर साधारण ब्राउन होईपर्यंत) ओव्हनमध्ये बेक करावे. द्राक्षाचे पुडींग खाण्यासाठी तयार ....!!!