Social Icons

Pages

Sunday, November 6, 2011

Rajsthan Recipe : शाही मावा कचोरी (राजस्थानी पाककृती)

प्रिय ग्रृहिणिंनो,

Rajsthani Recipes मध्ये शाही मावा कचोरिला विशेष स्थान आहे. पाहुयात "शाही मावा कचोरी" ची पाककृती...

साहित्य : पारीसाठी

१. दोन वाटी मैदा
२. दोन टेबलस्पून रवा
३. मोहनासाठी तिन टेबलस्पून तेल
४. मीठ
५. दूध
६. सजावटीसाठी ड्रायफ़्रूट्सचे काप
७. चांदीचे वर्ख

साहित्य : सारणासाठी

१. दोन वाटी मावा
२. चवीनुसार साखर
३. वेलची पूड
४. जायपत्री पूड़

कृति :

पारीचे सर्व साहित्य एकत्र करून दुधाने मऊसर भिजवून घ्या. तासभर बाजूला ठेवा. कढईत मावा भाजून घ्या. त्यात साखर-वेलची पूड़ मिक्स करून घ्या. मैद्याचे लिंबाएवढे गोळे घेउन-लहान पूरी लाटून त्यात मावाचे मिश्रण भरा. चांगले बंद करून हलक्या हाताने थोड़े लाटून तुपात मंद आचेवर खमंग तळून घ्या. गार झाल्यावर कचोरीला एक भोक पाडून तिन तारी पाकात बुडवून परातीत कचोरी तिरपी करून ठेवा. जास्तीचे पाक निघून जाईल. वरून चांदीचे वर्ख ड्रायफ़्रुट्सच्या कापांनी सजवा.

पहा कशी चव वाटते ते! ... आणि हो या Rajsthani Cuisine मधील हा प्रकार कसा झाला आहे ते अवश्य कळवा...
Post a Comment