आज राजस्थानी शाही लाडू ची कृति बघुयात ....
साहित्य :
१. २५० ग्रँम डाळ्या
२. २५० ग्रँम पिठीसाखर
३. २५० ग्रँम साजूक तूप
४. एक वाटी मिक्स ड्रायफ़्रूट्सचे काप
५. वेलची पूड़
६. जायपत्री पूड़
कृति:
डाळ्या मिक्सरमधून चांगली बारीक दळून घ्या. एका परातीत तूप घेउन चांगले फेटावे. त्यात पीठीसाखर-ड्रायफ़्रूटसचे काप-वेलची व जायपत्री पूड़ कालवावी. शेवटी थोडे-थोडे डाळ्याचे पीठ टाकून मिक्स करावेत. लाडू वळवता येईल असे मिश्रण तयार झाल्यावर लाडू वळावेत. वर चांदीचे वर्ख लावावे. लाडू झटपट तयार होतात. चवीलाही छान लागतात.

0 comments:
Post a Comment