Social Icons

Pages

Sunday, November 6, 2011

Rajsthan Recipe : राजस्थानी पापडी रायता (राजस्थानी पाककृती)

प्रिय ग्रुहिणिंनो,

राजस्थानी पापडी रायता हा एक राजस्थानचा चविष्ट प्रकार ... बघुयात याची पाककृती

साहित्य : पापडीसाठी

१. एक वाटी ज्वारीचे पीठ
२. चार वाटया आंबट ताक
३. मीठ, जिरे, तिळ

साहित्य : रायतासाठी

१. दोन वाटी दही
२. साखर-मीठ चवीनूसार
३. कोथिंबीर
४. फोडणिसाठी तेल
५. मोहरी

कृति :

पापडी करण्यासाठी ताकात मीठ एक टीस्पून ठेवा. ताकाला उकळी आल्यावर ज्वारीचे पीठ घालून हालवत राहा. चांगले मिक्स झाल्यावर मिश्रणावर झाकण ठेवून शिजवून घ्या. अधुनमधून ढवळा. चांगले शिजल्यावर प्लँस्टिक कागदावर लाटून पापड्या वाळवून घ्या. वाळल्यावर डब्यात भरून ठेवा. रायता करण्यासाठी पापड्या गरम पाण्यात उकडून घ्या. दह्यात सर्व वरील रायत्याचे साहित्य टाकून घुसळून घ्या.

वरून फोडणी तयार करून टाका. उकडलेल्या पापड्या पाण्यातून काढून दह्यात टाका आणि स्वादिष्ट पापडी रायता तयार...!!!

बघा करून एकदा...!!!
Post a Comment