Social Icons

Pages

Saturday, March 12, 2011

सरबत : पँशनफ़्रुट आणि बेलाचे

नमस्कार गृहिणींनो,

आज आपण या लेखात पँशनफ़्रुट आणि बेलाचे सरबत कशा प्रकारे तयार करावयाचे ते पाहुयात.

पँशनफ़्रूट्चे सरबत :

पिकलेले पिवळे पँशनफ़्रुट घ्यावे. त्याचे दोन भाग करावे. आतील गर चमच्याने काढून घ्यावा. त्यात चवीप्रमाणे साखर पाणी घालावे. साखर विरघळेपर्यंत हलवावे. सरबत गाळून घ्यावे.

पँशनफ़्रुटचा वास, चव तर चांगली असतेच पण त्याचा नैसर्गिक रंग फार सुंदर असतो. हे फळ सुकलेले दिसले तरी त्याचे सरबत करत येते.

पँशनफ़्रुटचा वेल अंगणात लावता येतो त्याला क्रृष्णकमळासारखी फुले येतात. अगणित फळे त्यावर लगडतात. पिकलेल्या पँशनफ़्रूट्चे सरबत करतात. त्याला वास फार छान असतो. साधारण एका फलापासून एक किंवा दिड ग्लास सरबत होते.

बेलाचे सरबत :

बेलफळ फोडून त्याचा गर काढावा. त्यात थोड़े पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. आव्यश्यकतेनुसार साखर लिंबाचा रस मीठ घालावे.

हे बेलाचे सरबत औषधी असते. तर करून बघा एक-एक सुंदर आणि सहज सोप्या सरबती कृति आपल्या किचनमधे..!!
Post a Comment