Social Icons

Pages

Friday, March 11, 2011

द्राक्षाचे काही टिकाऊ पदार्थ

मागील लेखात आपण द्राक्षांपासून करता येणा-या काही घरगुती रेसिपी पाहिल्या. आज द्राक्षांचे काही टिकावू पदार्थ कसे तयार करावयाचे ते पाहुयात.

द्राक्षाचा मुरंबा :

द्राक्षाचा मुरंबा करताना खालील साहित्य असणे अगत्याची आहे.

साहित्य : बिनबियांची द्राक्षे २ वाटया, साखर ३ वाटया, पाव चमचा वेलदोडे पुड

कृती : द्राक्षे साफ़ करून त्याचे देठ काढून टाकावेत. एका स्टीलच्या पातेल्यात वाटया द्राक्षे वाटया साखर एकत्र करून तासभर मुरत ठेवावीत.

एका जाड बुडाच्या पातेल्यात द्राक्षाचे मिश्रण घेउन मंद गँसवर शिजत ठेवावे साखर विरघळू लागेल. द्राक्षांचा रंग बदलला आणि पाक चटपटू लागला की पातेले गँसवरून खाली उतरून ठेवावे. वेलदोड्याची पूड घालावी. जिथून देठे काढलेली असतात. तिथून पाक आत शिरतो. यामुळे हा मुरंबा चांगला आंबट गोड होतो.

द्राक्षाचे लोणचे :

साहित्य : वाटी आंबटगोड द्राक्षे, चमचे मोहरी पूड, अर्धा चमचा मेथी, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चमचे बारीक मीठ, लिंबाएवढा गुळ, फोडणीचे साहित्य, तेल, मोहरी, हिंग, हळद

कृती : एका भांड्यात पाव वाटी तेलाची मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. गार होऊ द्यावी. दुस-या भांड्यात द्राक्षं चिरून घ्यावीत. मोहरीची पूड चमचे, लाल तिखट अर्धा चमचा; बारीक मीठ चमचे, थोडासा गूळ (आवडत असल्यास) एकत्र करून त्यावर गार झालेली फोडणी ओतावी. थोड्याशा तेलात अर्धा चमचा मेथी तळुन मग ती कुटावी द्राक्षाच्या लोणच्यात घालावी. लोणचे दुस-या दिवशी खावे. द्राक्षे आंबट नसल्यास अर्धे लिंबू पिळावे. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करावे...अवश्य चव घेउन बघा आणि मग कळवा तुमचा अभिप्राय ....!!
Post a Comment